डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१८ -१९
Click here for Online Application System
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शैक्षणिक वर्ष २०१७-१८
अ. ज्या विद्यार्थ्यांचे पालक सक्षम प्राधीकाऱ्याने प्रमाणित केल्याप्रमाणे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांचे पालक नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांकरिता सदर योजना आहे. वसतीगृह निर्वाह भत्ता (Hostel Maintenance Allowance) प्रति विद्यार्थी प्रतिमहा :.
महानगरांतील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद, नागपूर) प्रवेशित विद्यार्थी | रुपये 3000/- |
राज्यातील अन्य ठिकाणी प्रवेशित विद्यार्थी | रुपये 2000/- |
ब. ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकाांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु.1.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्षातील १० महिन्यांकरिता रु. ३०००/- निर्वाह भत्ता अदा करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी दिनांक ७ आक्टोबर २०१७ चा शासन निर्णय (201710071235108808) चे अवलोकन करावे.
टीप : सदर निर्वाहभत्ता हा शैक्षणिक वर्षातील सुटीचा कालावधी वगळुन उर्वरित 10 महिन्यांच्या कालावधीकरिता अनुज्ञेय असेल.