विना अनुदानित अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमंेट इत्यादी पदविका संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवाविषयक /आस्थापना विषयक बाबींबाबत कार्यवाही करणे.
शासकीय व अशासकीय अनुदानित पदविका संस्थांच्या नवीन प्रस्ताव तपासणींचे आयोजन करणे व त्याचेशी निगडीत असलेली इतर कामे.
शासकीय, अशासकीय अनुदानित व विना अनुदानित अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, ओैषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी पदविका संस्था सुरु करणे, नवीन अभ्यासक्रम व प्रवेश क्षमतेमध्ये बदल करणे इत्यादी बाबतच्या प्रस्तावास मान्यता देणे. (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी संबंधित पदविका अभ्यासक्रम)
विना अनुदानित तत्वावर सुरु करण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या प्रस्तावास मान्यता देणे.
मा. संचालकांच्या आदेशानुसार घेतलेल्या बैठका इत्यादी खर्चासाठी मान्यता देणे.
ऍ़क्रिडिटेशन मिळण्यासाठी संस्थांना प्रोत्साहन देणे. हा विभाग एनबीए च्या संपर्कात राहील.
पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था / अभ्यासक्रमांची नियमित तपासणी करणे इत्यादी.
पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थेतील वैयक्तिक लेखा निधी (PLA) व अंतर्गत महसूल निधी (IRG) व विद्यार्थी विकासनिधी मधून खर्चाकरीता पदविका संस्थंना मान्यता देणेबाबतची कार्यवाही करणे.