• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Dr. Panjabrao Deshmukh Vastigruh Nirvah Bhatta Yojna

Last updated on October 1st, 2024 at 02:36 pm

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/ शासकीय विद्यापीठे व त्या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे/ स्वयं अर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे वगळून ) मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे ( व्यवस्थापन कोटयातील / संस्था स्तरांवरील प्रवेश वगळून ) प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प-भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत अशा  विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ( Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojna )  लागू केली आहे. सदर  निर्वाहभत्ता योजना सन 2016-17 पासुन लागू केली आहे.


• योजनेच्या लाभासाठीचा संच ( Quota ) व शै.वर्ष 2023-24 पासून लाभाची रक्कम खालील प्रमाणे –

सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे जमाकरण्यात येते.

संच ( Quota ) –

अ.क्र. प्रकार राज्याच्या प्रत्येक जिल्हया-साठीचा संच (Quota)
1
ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर आहेत.
सर्व पात्र विद्यार्थी
2
आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ( कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा - 1 लाख पर्यंत )
सर्व पात्र विद्यार्थी
3
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ( कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा - 1 लाखापुढे ते 8 लाख पर्यंत )
500 पर्यंत मर्यादित संच ( 33 टक्के महिलां-करिता राखीव व अभ्यासक्रम निहाय गुणवत्ते नुसार )
लाभाची रक्कम ( रुपयांत )
अ.क्र. भत्ता मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांत उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी. इतर महसुली विभागीय शहरांतील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी इतर जिल्हयांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी. तालुका ठिकाणी उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.
1
भोजन भत्ता
32,000/-
28,000/-
25,000/-
23,000/-
2
निवास भत्ता
20,000/-
15,000/-
12,000/-
10,000/-
3
निर्वाह भत्ता
8,000/-
8,000/-
6,000/-
5,000/-
एकूण रक्कम
60,000/-
51,000/-
43,000/-
38,000/-
सदर योजनांची मंजुर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे जमाकरण्यात येते.

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत :-

1) संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टल (URL – https://mahadbt.maharashtra.gov.in) वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल व सुचनांचे पालन करुन, डिबीटी पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे.