• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Merit-Cum-Means

Last updated on July 24th, 2024 at 03:20 pm

गुणवत्ता-नि-साधन शिष्यवृत्ती योजना ( Merit-Cum-Means )

अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता -नि – साधन शिष्यवृत्ती योजना सन 2007-08 पासून सुरू केलेली आहे. सदर योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमां मध्ये (पदवी व पदव्युत्तर ) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लागू करण्यात आलेली आहे.सदर योजने करीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 2.50 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.

शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा (Quota) -

धर्मनिहायनविन ( Fresh ) शिष्यववृत्तीचासंच कोटा

धर्म मुस्लीम बौध्द ख्रिश्चन शिख पारशी जैन एकूण
विदयार्थ्यी संख्या
3328
1676
277
57
12
359
5709

शिष्यवृत्ती रक्कम -

सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
Sr.No. Type of Financial Assistance Rate for Hostler Rate for Day Scholar
1.
Maintenance Allowance (For 10 months only)
Rs.10,000/-per annum ( Rs.1000 p.m.)
Rs.5,000/- per annum. ( Rs.500 p.m.)
2.
Course Fee*
Rs.20,000/- per annum or Actual whichever is less
Rs.20,000/- per annum or Actual whichever is less
Total
Rs.30,000/-
Rs.25,000/-
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येते. उपरोक्त योजनांची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाच्या संकेतस्थळ www.minorityaffairs.gov.in) / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.

सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ -www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.