• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

National Scholarship Scheme for Post Graduate Studies

Last updated on जुलै 24th, 2024 at 03:35 pm

पदव्युत्तर पदवी अभ्यासासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

[UGC-National Scholarship for Post Graduate Studies]

विश्व विद्यालय अनुदान आयोग, शिक्षण मंत्रालय,नवी दिल्ली (UGC) यांनी वेळोवेळी निर्दिष्ट आणि अधिसूचित केलेल्या विद्यापीठ /महाविद्यालय /संस्थेमध्ये मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण  घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युजीसीने भारतात पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे सर्व स्त्रोतांमार्फत मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 4.5 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा कमी निश्चित करण्यात आलेली आहे.

सन 2023-24 पासून सदर योजनेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून संपूर्ण देशासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्तीचा संच निर्धारीत करण्यात आला आहे.

शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) -

अ. क्र. अभ्यासक्रम संच संख्या
1
पदव्युत्तर पदवी
10,000

शिष्यवृत्ती रक्कम -

अ. क्र. शिष्यवृत्तीचे घटक एक रक्कम ( Lump sum Amount )
शिष्यवृत्ती
रु.1,50,000/- प्रति वर्ष
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येईल.
सदर योजनांची सविस्तर माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळ – केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.