Last updated on July 22nd, 2024 at 02:33 pm
सक्षम शिष्यवृत्ती योजना
राज्य | अ क्र. | अभ्यासक्रम | संचसंख्या |
महाराष्ट्र | 1 | पदविका | सर्व पात्र |
2 | पदवी | सर्व पात्र |
शिष्यवृत्ती रक्कम –
अ.क्र. | शिष्यवृत्तीचेघटक | एक रक्कम ( Lump sum Amount ) |
अ | संस्थेला देय असणारे शुल्क, संगणक स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर इ. | रु.50,000/-प्रतिवर्ष |
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येते.
सदर योजनांची सविस्तर माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळ –www.aicte-india.org / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईन रित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी चालू शैक्षणिक वर्षा मध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.