Last updated on July 24th, 2024 at 03:16 pm
उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना (भाग - 1 वैद्यकिय अभ्यासक्रम वगळून )
अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गुणवत्ताधारक व तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण ( पदविका, पदवी व पदव्युत्तर ) घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना सन 2008-09 पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 8.00 लाखा पर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर योजनेकरीता विदयार्थ्यांने माध्यमिक शालांत परिक्षा ( एस एस सी ) महाराष्ट्र राज्यातुन उत्तीर्ण केलेलीअसावी.
सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र अल्पसंख्यांक विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात येणारे प्रत्यक्ष वार्षिक शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क किंवा रुपये 50,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पध्दत :-
1) संस्थेमध्ये शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या महाडिबीटी पोर्टल (URL – https://mahadbt.maharashtra.gov.in) वर देण्यात आलेल्या युजर मॅन्युअल व सुचनांचे पालन करुन, डिबीटी पोर्टलवर दर्शविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार संपुर्ण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावे.