• महाराष्ट्र शासन
  • Government of Maharashtra
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • Higher & Technical Education Department

Scholarship For Top Class Education for Students with Disabilities

Last updated on July 24th, 2024 at 03:22 pm

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना ( Scholarship For Top Class Education for Students with Disabilities ) :-

सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग यांचेमार्फत सन 2015-16 पासून दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाकडून दिलेल्या नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण ( पदवी व पदव्युत्तर पदवी /पदविका अभ्यासक्रम ) घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना ( Scholarship For Top Class Education for Students with Disabilities ) ही शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे.सदर योजनेकरीता दिव्यांगाचे प्रमाण 40 % किंवा त्यापेक्षा अधिक व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (दोन्ही पालकांचे एकत्रित ) रुपये 8.00 लाखा पर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे.सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) –
अ.क्र. राज्य नविन ( Fresh ) संच/कोटा (Quota)
      2015-16 2016-17 2017-18 2018-19 पासुन..
1 महाराष्ट्र 16 16 16 31

शिष्यवृत्ती रक्कम -

सदर योजनेंतर्गत नविन शिष्यवृत्ती व नूतनीकरणासाठी आलेल्या पात्र विद्यार्थ्यांला खालील प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
अ.क्र. शिष्यवृत्तीचे घटक रक्कम
अभ्यासक्रमास लागू असलेले शैक्षणिक शुल्क व ना-परतावा शुल्काची प्रतिपूर्ती
प्रत्यक्ष वार्षिक शुल्क किंवा रु.2,00,000/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.
देखभाल /परिरक्षण भत्ता
रु. 3,000/- प्रति महिना वसतिगृहामध्ये राहणा-या विद्यार्थ्यांना रु. 1,500/- प्रति महिना डे-स्कॉलर विद्यार्थ्यांना
विशेष भत्ते ( दिव्यांगाच्या प्रकारानुसार त्या अनुषंगिक उदा.वाचन भत्ता, संरक्षण भत्ता, मदत भत्ता इ.)
रु. 2,000/- प्रति महिना
पुस्तके व स्टेशनरी
रु. 5,000/- प्रति वर्ष
संगणक व त्याच्या संबंधित सुटे भाग खरेदीच्या खर्चाची प्रतिपूर्ती
रु. 45,000/- पूर्ण अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एकदाच देय.
निवड झालेल्या उमेदवारांच्या विशिष्ट दिव्यांगासाठी आवश्यक असलेल्या सॉफ्टवेअरसह मदत व मदतीच्या साहित्याची खरेदीच्या खर्चाची प्रतिपूर्ती
रु. 30,000/- पूर्ण अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात एकदाच देय.
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येते..उपरोक्त योजनांची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या (संकेतस्थळ-www.disabilityaffairs.gov.in )/केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ- www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in) ऑनलाईनरित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.