Last updated on जुलै 22nd, 2024 at 03:16 pm
स्वनाथ शिष्यवृत्ती योजना
[ AICTE-Swanath Scholarship Scheme for Students (Degree / Diploma)]
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद़ेची मंजूरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये ( पदविका, पदवी ) शिकणाऱ्या अनाथ किंवा ज्या विद्यार्थ्याचे आई वडील दोघेही किंवा दोघांपैकी एक कोव्हिड-19 ने मृत्यू पावले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक सशस्त्र दल आणि केंद्रीय निमलष्करी दलांच्या कारवाईमध्ये शहीद झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्वनाथ शिष्यवृत्ती योजना सन 2021-22 पासून सुरू केलेली आहे. सदर योजनेकरीता कुटुंबाचे सर्व स्त्रोतांमार्फत मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखापर्यंत निश्चित करण्यात आलेले आहे. सदर योजनासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल ऑफिस म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीचा नविन ( Fresh ) संच/कोटा ( Quota ) –
अ क्र. | अभ्यासक्रम | संचसंख्या |
1 | पदविका | 1000 |
2 | पदवी | 1000 |
शिष्यवृत्ती रक्कम-
अ.क्र. | शिष्यवृत्तीचेघटक | एक रक्कम ( Lump sum Amount ) |
अ | संस्थेला देय असणारे शुल्क, संगणक स्टेशनरी, पुस्तके, यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर इ. | रु.50,000/- प्रतिवर्ष |
सदर योजनांची मंजुर रक्कम केंद्र शासनाकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये Direct Benefit Transfer ( DBT ) अंतर्गत जमा करण्यात येईल.
सदर योजनांची सविस्तर माहिती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळ –www.aicte-india.org / केंद्र शासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टल (संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) वर देण्यात आलेली आहे.
सदर योजना केंद्रशासनाच्या National Scholarship Portal ( NSP ) पोर्टलद्वारे ( संकेतस्थळ – www.scholarships.gov.in ) ऑनलाईन रित्या राबविण्यात येते. सदर योजनेच्या लाभासाठी चालू शैक्षणिक वर्षा मध्ये प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्षात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी नवीन ( Fresh ) व मागील शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या पात्र विद्यार्थ्यानी नुतनीकरणासाठी ( Renewal ) अर्ज NSP पोर्टलवर नमूद करण्यात आलेल्या अंतिम मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.